Saturday, 14 April 2012

प.पू.नारायणकाका ढेकणेमहाराज यांच्या
सिद्धयोग मार्गाचे
विश्व महायोग संमेलन 

दि. 2 व 3 मे 2012 रोजी पुणे येथे आयोजित केले असून
त्याचे आपणा सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण आहे.
पुज्य काकांच्या आपल्या मस्तकावर असणाऱ्या वरदहस्ताची ही पावतीच होय.
    या सिद्धयोग मार्गातला सर्वांसाठीचा महत्वाचा भाग म्हणजे सिद्धयोग पूर्वाभ्यास.
यात काय करावयाचे ? तर आपले घरीच शांतपणे डोळे मिटून स्वस्थ बसावे,
शरीर जणू नाहीच अशा प्रकारे अत्यंत ढिले सोडावे आणि
आपोआप आपल्या नाकातून आत-बाहेर होणाऱ्या
श्वासांच्या क्रीयांकडे (त्या कशा होतात) फक्त पाहत रहावे.
असा हा सिद्धयोग पूर्वाभ्यास असून दररोज 3 ते 18 मिनिटे केल्यामुळे
आपल्या जीवनात काय सात्विक बदल घडतात ते आपणच अनुभवावे.
समत्व योगाचा मार्ग आपोआपच खुला होतो.
मानसीक शांतता आणि बाह्य परिस्थिती आपणास अनुकुल होते.
    सध्याच्या धावपळीच्या युगात मनुष्याला फक्त याच गोष्टींची गरज आहे.
आणि या मार्गात एक पै ही खर्च करावा लागत नाही की
कुठे यासाठी जाण्याचे कारणही नाही. आपण आपल्या स्वगृहीही हा प्रयोग करु शकता.
यास जात-पात-पंथ-धर्म-स्त्री-पुरुष आदी कसलेही भेद नाहीत.
सर्वांसाठी, सर्वांच्या कल्याणासाठी असणारा हा प्रयोग काय आहे ?
याबाबत आपणास सखोल मार्गदर्शन लाभणार आहे या विश्व महायोग संमेलनात.
    आपणा सर्वांना यात सहभागी होता येईल.
प्रवेश विनामुल्य असून आपणाकडून आपले नातेवाईक, मित्रपरिवार
आदी जास्तीत जास्त लोकांपर्यन्त या निमंत्रणाचा प्रसार होऊन
सर्वांनी या कार्यक्रमास अवश्य उपस्थित राहण्याबद्दल
प.पु.श्री. काका महाराजांनी हे आपणास आशिर्वादपर निमंत्रण पाठविले आहे.
    जीवनातील खरा आनंद भोगण्याची ही संधी दवडू नये या करीता
आपण अवश्य उपस्थित रहावे हीच विनम्र प्रार्थना.
कार्यक्रमाचे स्वरुप -
• बुधवार दि. 2 मे 2012 रोजी सायं. 6.30 ते रात्री 9 पर्यन्त
लॉ कॉलेज मैदान, लॉ कॉलेज रोड, एरंडवणे, पुणे येथे -
* दीप प्रज्वलन * स्वागत * सत्कार
* कार्यक्रमाचे अध्यक्ष - प्रसिद्ध संगणक शास्त्रज्ञ डॉ. विजय भाटकर
* प्रमुख पाहुणे - डॉ. विश्वनाथ कराड
* जाहिर प्रवचन - प.पू. नारायणकाका ढेकणे महाराज (वैश्विक महायोग पूर्वाभ्यास प्रयोग)
• गुरुवार दि. 3 मे 2012 रोजी सकाळी 7 ते दुपारी 12.30 पर्यन्त
पंडीत दीनदयाळ विद्यालय, श्री वामन निवास समोर, एरंडवणे, पुणे येथे -
* सामुहिक साधना * कीर्तन - प.पू.श्री.मोरेश्र्वरबुवा जोशी (चाऱ्होलीकर)
* आशिर्वचन - योगतपस्वी प.पू.श्री.नारायणकाका ढेकणे महाराज
* सांगता समारंभ * महाप्रसाद.
संयोजक प्रमुख स्थळ : श्री वासुदेव निवास, 42/17, कर्वे रोड, कासट साडी सेंटरच्या मागे, नळ स्टॉप, पुणे 04
अधिक माहितीसाठी संपर्क : 9850778494 / 9423011997 / 9822023549 / 9822846918
Website : www.mahayogaglobalmeet.info

No comments:

Post a comment